35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News तालिबानने केलेल्या हल्ल्यात एकूण ३७ ठार

तालिबानने केलेल्या हल्ल्यात एकूण ३७ ठार

0
28

blank

वृत्तसंस्था
काबूल, दि. ९ – अफगाणिस्तानमधील कंधार विमानतऴाजवळील शाऴेजवळ आणि येथील मार्केट परिसरात तालिबानी या दहशतवादी संघटनेने मंगळवारी रात्री केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ३७ जण ठार झाल्याची माहिती येथील अधिका-यांनी दिली.
कंधार विमानतळाच्या परिसरात तालिबानी संघटनेचे दशहतवादी घुसले आणि त्यांनी गोळीबार केला. यात ३७ जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाल्याचे येथील संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, जवानांनी नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला असून एका जखमी झालेल्या दहशतवाद्यांला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या हल्यातील जखमींना येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

blank