पवारांच्या ‘पत्रिके’तून सोनिया आऊट, मोदी इन

0
14

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक दुर्मिळ क्षण पाहायची संधी हुकलीय… या निमित्तानं शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी या दिग्गजांना एकाच स्टेजवर पाहायची संधी मिळाली असती. 

या निमित्तानं शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे तिघे एकाच स्टेजवर एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमंत्रण पत्रिकेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव नाही. त्यामुळं सोनिया गांधी पवारांच्या वाढदिवसाला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

 

पवारांच्या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची नावं आहेत. मात्र सोनिया गांधीच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आला आहे. त्यामुळं सोनिया गांधी या कार्यक्रमाला येणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.