36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय दीपक केदार यांच्या समर्थनात RPI डेमोक्रॅटिक:- पँथर डॉ. माकणीकर

दीपक केदार यांच्या समर्थनात RPI डेमोक्रॅटिक:- पँथर डॉ. माकणीकर

0
20

blank

मुंबई – पँथर सेना प्रमुख दीपक केदार यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष असून चैत्यभूमी येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून दीपक केदार यांनी जाहीर माफी मागितल्यास समाज त्यांच्या सोबत उभा राहील असा आशावादही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकनिकर यांनी व्यक्त केला.

चळवळीचा उमलता चेहरा प्रसंगावधान न ठेवल्याने व चुकीचा दिवस वेळ आणि भूमी निवडल्याने आज बंदीस्त झाला असला तरी कायम राहणार नाही.
व अस होऊ ही नये, शिवाय एका चुकीमुळे, चळवळीत स्वतःला झोकून देणाऱ्या आंबेडकरी अनुयायास अस जेरबंद करून त्याचा आवाज दाबला जाऊ नये असं प्रामाणिक मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे असल्याचे स्पस्ट केले.

पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या आदेशानुसार लीगल प्रमुख ऍड नितीन माने यांच्या मार्गदर्शनाखाली लीगल टीम त्यांच्या मदतीत राहनार असून प्रसंगी सामाजिक भावनेतून सर्वार्थाने त्याच्या समर्थन राहू असा मनोदय हिं पँथर डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केला.

blank