31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ संताजी जगनाडे महाराजांच्या 392 व्याजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली

संताजी जगनाडे महाराजांच्या 392 व्याजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली

0
20

गोंदिया,दि.13 : युवा समिती तेली समाज गोंदियाच्या 392 व्या संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरात मोटारसायकल रॅली काढून संताजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. संताजी विका मंडाळाचे अध्यक्ष सुनिल लांजेवार यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी देवून सुरूवात करण्यात आली. रॅली श्री संताजी सांस्कृतिक भवन पिंडकेपार पासून निघून शक्ती मंदिर सूर्याटोला येथे समारोप करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी तेली समाजाचे आनंद कृपाण तसेच कैलाश भेलावे, के.एस.आगाशे संतोष खोब्रागडे, दिलीप तुळसकर, राजू वंजारी, शंकर चामट, सावन माहुरे, बाबू तुलसीकर, विजय मदनकर, उमेंद्र भेलावे, राजेश कापसे, मुकुंद धुर्वे,कमल हटवार चंद्रकांत चामट, राधेश्याम कांजेकर, लोकचंद डोनेकर, बलिराम डोरले, मुकेश पाटील, हरिराम बुध्दे, रुपेश तळवेकर, रामभाऊ वंजारी, दिलीप येरणे, सचिन पाटील, हरिश तुळसकर, राहुल मदनकर, गुरूदास गिरेपुंजे, माधव भेलावे, अमोल चामट, राहुल वंजारी, विक्की बावनकर, मिथेस बावनकर, प्रशांत वंजारी, रवि भेलावे, सतिश राजुरकर, किर्ती येरणे, महेश कापसे, नितीन निखाडे, मनिष बावनकर, चेतन तुळसकर, दुर्गेश पाटील, निरज डोरले, रामेश्‍वर पाटील, संतोष कुरंजेकर उपस्थित होते. रॅली बाजपेयी वार्ड,मुन्ना चौक,माताटोली,शंकर चौक,गाधी प्रतिमा,पालचौक,राजल्क्षमी काॅम्पलेक्स मार्ग शक्तीमंदीर सुयार्टोला येथे पोचली. आभार कमल हटवार यांनी मानले.