मानवाधिकार संघटनेच्यावतीने मानवाधिकार दिवस

0
4

गोंदिया  दि. १३: येथील मनोहरभाई पटेल इंस्टीट्यूट ऑफ बी.फार्मसीमध्ये गुरूवारी (दि.१0)  मानवाधिकार संघटनेच्यावतीने मानवाधिकार दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, न्यायीक सल्लागार अँड.अर्चना नंदागहाळे, सचिव आदेश शर्मा, एमआयडीपीचे प्राचार्य टी.जी.अग्रवाल व मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष धर्मिष्ठा सेंगर उपस्थित होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी, मनुष्याची बुद्धी हीच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यास महत्वाची असते. मानवाधिकार दिनाचे मुळ ध्येय आमचे स्वातंत्र्य आमचे अधिकार हे आहे असे सांगीतले. तसेच विकसीत झालेल्या टेक्नॉलॉजी यांचा वापर योग्य वापर करून फेसबूक व व्हॉट्सअँप वापरताना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांनी मानवाने प्रेम, आपुलकी, सदसदविवेकबुद्धी यांचा विचार करूनच आपले विचार ठेवावे. या आधुनिक जगात वावरताना सुशिक्षीत होण्याबरोबरच सुसंस्कारी होणे जास्त महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. प्राचार्य इंदूरवाडे यांनी, नवीनतम टेक्नॉलॉजीचा वापर कमीत कमी करून योग्य कामासाठीच मोबाईलचा वापर करावा असे मत व्यक्त केले.
प्रास्तावीक प्रा. योगेश तिवारी यांनी मांडले. संचालन धर्मिष्ठा सेंगर यांनी केले. आभार आदेश शर्मा यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. रिझवाना शेख, प्रा. पुरोहीत, प्रा.निबेकर, प्रा. काटोलकर, प्रा. दीपक फुंडे, नागेश देशमुख, रितीन पारधी, कैलाश मेश्राम, अमर मिश्रा, गोपेश बाजपेई यांनी सहकार्य केले.