देवरी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा सोमवारी

0
17

गोंदिया  दि. १३:शेतकरी मजूर संघटना ककोडी, चिचगड परिक्षेत्राच्या वतीने मोर्चा सोमवार (दि.१४) ला सकाळी १0 वाजता उपविभागीय कार्यालय देवरीवर काढला जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार शेतकरी मजूर संघटना ककोडी, चिचगडच्या वतीने २ सप्टेंबर २0१५ला ७000 च्या वर शेतकर्‍यांनी पदयात्रा करून शेतकर्‍यांनी आपले निवेदन उपविभाग अधिकारी सूर्यवंशी यांना दिले.परंतु शासनाच्या वतीने दुष्काळ भागासाठी पाऊल उचलण्यात आले नाही. सतत दुष्काळ भागात शेतकर्‍यांना शासन सामान्य माणसाचा जीवन मरणाचा प्रश्नावर दुर्लक्ष करीत आहे. सामान्य शेतकर्‍यांच्या उपजिवीकेचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकर्‍यामध्ये क्रांती घडवून शासनाला आव्हाण मोर्चा काढण्याची तयारी केली आहे.
गोंदिया जिल्हा सरसकट दुष्काळ ग्रस्त घोषीत करा, प्रति एकर २५000 रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, गुरांच्या चार्‍याची सोय करावी, पिक कर्ज त्वरीत माफ करावे, प्रसव विमा पास करावे, अश्या विविध मागण्यांना घेऊन शेतकरी मजूर संघटनेने दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकर्‍यांना या संकटातून सावरण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवानी आपली समस्या शासन दरबारी पाठविण्यासाठी आयोजित केलेल्या उपविभागीय कार्यालयावरील मोच्र्यात अधिक संख्येत संख्येत उपस्थित राहून प्रदर्शन करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.