
साकोली–जेव्हापासून जेएमसी कंपनीने साकोली येथे फ्लायओव्हरच्या कामाकरिता सुरुवात केली तेव्हापासून लाखांदूर रोड अंडरपास व सर्व्हिस रोडवर पथदिवे कंपनीतर्फे लावण्यात आले नाही. त्यामुळे, या परिसरात सायंकाळ होताच अंधार दाटून येतो. लाखांदूर रोडपासून समोर गोधरा रोड या परिसरात स्थानिक शेतकर्यांच्या शेती असून, याच भागातून सर्व शेतकर्यांना, नागरिकांना महिला विद्यार्थ्यांना जावे लागते. त्यामुळे, रात्रीच्या वेळेस एखादी अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता नागरिकांकडून व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वारंवार निवेदन देऊनसुद्धा सदर कंपनीने या परिसरात लाईटची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पंचायत समितीचे माजी सभापती, मदन रामटेके व नगरसेवक हेमंत भारद्वाज यांच्या नेतृत्वात नुकतेच महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी नाना पटोले यांनी सांगितले की, जोपर्यंत सर्विस रोड व सर्व्हिस रोडचे काम पूर्ण होत नाही व या परिसरात दिव्यांची व्यवस्था तसेच सौंदर्यीकरण कंपनीकडून होत नाही तोपर्यंत फ्लायओव्हरचे उद््घाटन होऊ देणार नाही.
श्रीराम भात गिरणी ते लाखांदूर रोडपर्यंत रस्त्यावर अंधार राहत असल्यामुळे रात्री-बेरात्री येणारे, जाणार्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. उड्डाणपुलामुळे दोन्ही बाजूला अंधार राहतो. अशा परिस्थितीत तिथून येणार्या जाणार्यांना खूप त्रास होतो, यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले.
श्रीराम भात गिरणी ते लाखांदूर रोड पयर्ंत दोन्ही बाजूला स्ट्रीट लाईट व डीवाईडर वर झाडे लावून सौंदर्यीकरण करण्यासाठी तसेच साकोली ते सेंदुरवाफा पयर्ंत सर्विस रोड हा सुद्धा नवीन डांबरीकरण करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी नाना पटोले यांनी नॅशनल हायवे व जे. एम. सी. च्या अधिकार्यांशी फोन करून सांगितले की, जेव्हा पयर्ंत या निवेदनानुसार कार्य होणार नाही तेव्हापयर्ंत उड्डाणपुलाचे उद््घाटन होऊ देणार नाही.
याप्रसंगी मदन रामटेके, माजी सभापती पंचायत समिती साकोली नितीन बावनकर, नगरसेवक हेमंत भारद्वाज, अनिल मुरकुटे, दुर्गेश चव्हाण व साकोली नगरवासी उपस्थित होते.





