
वृत्तसंस्था
नवी दिल्ली – सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चार्टर्ड प्लेनला दिल्ली जवळील शहाबाद मोहम्मदपूर येथे अपघात झाला. यात दोन जण ठार झाले तर 8 जण जखमी आहेत. सुपरकिंग एअरक्राफ्ट दिल्लीहून रांचीला निघाले होते. ही दुर्घटना सकाळी 9.45 वाजता घडली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह घटनास्थळी पोहोचले. दिल्लीच्या द्वारका सेक्टर-8 जवळील शहाबाद मोहम्मदपूर येथे घटना झाली. कंट्रोल रुमसोबतचा संपर्क तुटल्यानंतर विमान एका घराच्या छताला भिडले. विमानाने कोसळ्याच्या काही मिनीटांआधीच उड्डाण केले होते. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 15 गाड्यानी लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.टेक ऑफ झाल्याबरोबर पायलटने तांत्रिक बिघाड झाल्याचे म्हटले होते. त्यांनी विमानतळाकडे आपातकालिन लँडिंगची मागणी केली होती. लँडिंग दरम्यान ही दुर्घटना झाली.
बीएसफचे महासंचालक डी.के. पाठक यांनी घटनेला दुजोरा दिला. चार्टर्ड प्लेन रांचीला जात होते. यात 6 ते 8 प्रवासी बसू शकतात. हे विमान रांचीला नक्षलवाद्यांविरोधातील ऑपरेशनसाठी चालले होते. विमान कोसळल्यानंतर काही ठिकाणी आग लागली होती. आग विझवण्यात फायर ब्रिगेडला यश आले आहे.





