भुजबळ यांची मुंबईतील मालमत्ता ‘ईडी’ने केली जप्त

0
16

मुंबई, दि. २२ – महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपांमध्ये अडकलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढल्या असून भुजबळ यांची सांताक्रूझ व वांद्रे येथील मालमत्ता मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जप्त केली. या दोन्ही मालमत्तांची मूल्य सुमारे ११० कोटी रुपये इतके आहे. गेल्या महिन्यातच भुजबळांच्या खारघरमधील मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली होती. त्यानंतर आता वांद्रे व सांताक्रूझ येथील मालमत्ताही जप्त झाल्याने भुजबळ यांच्याविरोधातील कारवाईचा फास आवळण्यात आल्याचे दिसत आहे.