29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय 2022च्या केंद्रीय अर्थसंकल्प आत्मनिर्भरतेच्या दृष्टिने देशाची वाटचाल अधोरेखित करणारा आणि विकासाला चालना...

2022च्या केंद्रीय अर्थसंकल्प आत्मनिर्भरतेच्या दृष्टिने देशाची वाटचाल अधोरेखित करणारा आणि विकासाला चालना देणारा बजेट- विधायक डॉ. परिणय फुके

0
32

blank

नागपुर। देशाच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने देशाची वाटचाल अधोरेखित करणारा आणि त्यावर जोर देणारा अर्थसंकल्प आहे. देशाच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे.

2022च्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशाचा अन्नदाता शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. या योजनांसाठी केंद्र सरकारचे मी अभिनंदन करतो व आभार मानतो. शेतातील पिकांचे मुल्यांकन, जमीन अभिलेखांचे डिजिटलायझेशन, कीटकनाशके आणि पोषक तत्वांची फवारणी यासाठी ‘किसान ड्रोन’चा वापर हे पाऊल नक्कीच आधुनिक व आत्मनिर्भर भारताचे चित्र स्पष्ट करणारे आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात झिरो बजेट शेतीला विशेष प्रोत्साहन दिल्याबद्दल मी केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आभार मानतो. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन आणि विस्तार संस्था आणि कृषी मूल्य साखळीतील भागधारकांच्या सहभागासह शेतकऱ्यांना डिजिटल आणि हाय-टेक सेवा पुरवण्यासाठी पीपीपी मॉडेलमध्ये योजना सुरू करण्याचीही तरतूद आहे.

तसेच शेती उत्पादन मूल्य साखळीसाठी संबंधित कृषी आणि ग्रामीण उपक्रमांसाठी स्टार्ट-अप्सना वित्तपुरवठा करण्यासाठी नाबार्डद्वारे निधीची सोय केली जाईल ही घोषणा सामान्य शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.

अर्थसंकल्पात रस्ते, रेल्वे, ऊर्जा, आरोग्य तसेच शिक्षण, महिला, युवावर्ग, पायाभूत सुविधा या क्षेत्रांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेणारा हा अर्थसंकल्प आहे. यासाठी मी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि श्रीमती निर्मला सीतारामन यांचे विशेष अभिनंदन करतो.

blank