34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ धान खरेदी प्रक्रियेला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

धान खरेदी प्रक्रियेला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

0
154

blank

गोंदिया,दि.1 : शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप
पणन हंगाम 2021-22 मधील धान खरेदीचा कालावधी 31 जानेवारी 2022 पर्यंत
होता. परंतू सदर कालावधीत ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडून शासन
उद्दिष्टपूर्ती न झाल्यामुळे शासनाकडून 8 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ
देण्यात आलेली आहे. तरी धान उत्पादक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी
त्यांचेकडील धान ऑनलाईन नोंदणी केलेल्या धान खरेदी केंद्रावर अथवा
तालुक्यातील इतर खरेदी केंद्रावर विहित मुदतीत विक्रीसाठी आणावे व
शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा पणन अधिकारी मनोज
वाजपेयी यांनी कळविले आहे.

blank