32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home क्रीडा पांढरवाणी येथे आयोजित क्रीडा संमेलनाचे उदघाटन

पांढरवाणी येथे आयोजित क्रीडा संमेलनाचे उदघाटन

0
24

blank

 सडक अर्जुनी दि.२५:: स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ केंद्र सडक अर्जुनीच्या वतीने जि.प. व प्राथमिक शाळा पांढरवाणी येथे आयोजित क्रीडा संमेलनाचे उद््घाटन जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते, जि.प.सदस्य सरीता कापगते यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी उपसभापती विलास शिवणकर, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, पं.स.सदस्य राजेश कठाणे, जि.प.सदस्य मिलन राऊत, गटशिक्षणाधिकारी एम.एल. मेश्राम, विस्तार अधिकारी आर.एम. कोवे, केंद्रप्रमुख डी.टी. भावनकुळे, सरपंच इंदू कापगते, दामोधर लाडे, राजकुमार बागडे, यशवंत मेंढे उपस्थित होते. सडक अर्जुनी केंद्रांतर्गत १५ शाळांतील ७0४ खेळाडू विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर डोंगरवार यांनी तर संचालन एस.पी. साखरे व आभार पी.एस. उके यांनी मानले. 

blank