40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ उपराजधानीत तीन बळी

उपराजधानीत तीन बळी

0
24

नागपूर,दि.२५ – कडाक्‍याच्या थंडीने 24 तासांत नागपूर शहराचा पारा पाच अंशांनी घसरला असून, थंडीने तीन जणांचा बळी घेतला. बुधवारी सायंकाळपासून वातावरणात अचानक बदल झाला. हवेतील गारठ्यामुळे पारा तब्बल पाच अंशांनी खाली घसरून 13.4 अंशांवर स्थिरावला. दिवसभर बोचरी थंडी जाणवली. सायंकाळी गारठा अधिकच जाणवतो. थंडीने बळी घेतलेल्यापैकी एकाची ओळख पटली. मात्र, अन्य दोघांची ओळख पटू शकली नाही. रेल्वे व्हरांड्यासमोरील दुभाजकावर एक व्यक्‍ती मृतावस्थेत आढळून आली. खिशातील चिठ्‌ठीवरून त्याची ओळख पटली असून शेख पिंटू शेख इमाम (वय 60) असे त्याचे नाव आहे. याशिवाय पश्‍चिम प्रवेशद्वारावरील स्वयंचलित पायऱ्यांशेजारी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास आणखी एक अनोळखी व्यक्‍ती मृतावस्थेत आढळली.

blank