महाराष्ट्रात शिक्षण विकणारे महर्षी – मनोहर पर्रीकर

0
8

मुंबई दि.२५ – महाराष्ट्रात आतापर्यंत शिक्षण देण्याऐवजी शिक्षण विकणारे महर्षी तयार झाले. शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या या मंडळींनी पदवीपासून डॉक्‍टरेटपर्यंत छापील पदव्या वाटल्या. म्हणूनच स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण दिले जावे यासाठी अभाविपने प्रयत्न करावेत, असे आवाहन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विद्यार्थ्यांना केले. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाचे उद्‌घाटन वांद्रे रेक्‍लमेशन येथे आज झाले. त्या समारंभात पर्रीकर बोलत होते. अधिवेशनाचा समारोप शनिवारी (ता. 26) होणार आहे.

पर्रीकर म्हणाले, ‘देशात चारित्र्यवान नागरिक निर्माण होणे महत्त्वाचे आहे. माहिती तंत्रज्ञानाचा भडिमार होत असलेल्या या काळात यश लगेच मिळू शकते; पण त्यापूर्वी अपयश पचवण्याची ताकदही निर्माण व्हायला हवी.‘‘ प्रमुख पाहुणे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त म्हणाले, “”स्वतःचा विकास, प्रगती साधण्यासोबतच अभाविपने समाजमनही प्रगल्भ करावे.‘‘ वरदराज बापट यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. राज्यभरातून सुमारे तीन हजार विद्यार्थी अधिवेशनाला उपस्थित आहेत.