31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय कुरखेड्यात शिवसेनेचा भाजपा धक्का

कुरखेड्यात शिवसेनेचा भाजपा धक्का

0
57

blank

कूरखेडा: नगरपंचायतचा सार्वत्रिक निवडणुकीत कुरखेडा न.पं. भाजपाला स्पष्टबहूमत मिळूनही बंडखोरीमूळे सत्ता गमविण्याची नामूश्की पत्करावी लागली. शिवसेना-कांग्रेस आघाडीकडून अध्यक्षपदावर शिवसेनेची अनिता राजेंद्र बोरकर तर उपाध्यक्ष पदावर भाजप बंडखोर जयश्री चरण रासेकर हे ९ विरूद्ध ८ मताचा फरकाने निवडून आले.
अध्यक्षपदाकरीता शिवसेना कांग्रेस आघाडीचा वतीने अनिता बोरकर यानी नामांकन दाखल केला होता तर भाजपाचा वतीने अल्का गिरडकर यानी नामांकन दाखल केले होते. ९ सदस्य संख्येसह येथे भाजपाला स्पष्ट बहुमत आहे. मात्र अध्यक्षस्थानावरून पक्षातच एकमत नसल्याने कूरबूरी सूरू होत्या नेमकी हीच परीस्थीती हेरत शिवसेना -कांग्रेस आघाडीचा पुढार्‍यांनी गूप्त हालचाली करीत भाजपाचा नाराज असलेल्या नगरसेविका जयश्री रासेकर यांचाशी संवाद साधला व याची भनक सूद्धा भाजपा पुढार्‍यांना रविवार सांयकाळ पयर्ंत लागू दिली नाही. आज सकाळी बंडखोर भाजपा सदस्य जयश्री रासेकर यानी शिवसेना- कॉंग्रेस आघाडीचा सदस्यासह सभागृहात प्रवेश केला, तेव्हांच परीस्थी स्पष्ट झाली. बहूमतात असलेली भाजपा अल्पमतात आलेली शिवसेनेची अनिता बोरकर यांनी भाजपाचा अल्का गिरडकर यांचा व उपाध्यक्ष पदाकरीता आघाडीचा वतीने दाखल बंडखोर भाजप नगरसेविका जयश्री रासेकर यांनी भाजपा उमेदवार कलाम शेख (बबलू हूसैनी) यांचा ९ विरूद्ध ८ मतानी पराभव केला. निवडणूक परीणामाची घोषणा होताच आघाडीचा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमूख किरण पांडव, कॉंग्रेस जिलाध्यक्ष महेन्द्र ब्रम्हाणवाडे, शिवसेना जिल्हाप्रमूख सूरेन्द्रसिंह चंदेल, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जिवन नाट, तालुकाध्यक्ष जयंत हरडे, माजी नगराध्यक्ष डॉ. महेन्द्रकुमार मोहबंसी, शोएब मस्तान,आशाताई तूलावी, निरांजनी चंदेल यांचासह शिवसेना, कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यानी काम पाहीले.

blank