30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News इसिसमध्ये जाणा-या ३ तरूणांना नागपूरमध्ये अटक

इसिसमध्ये जाणा-या ३ तरूणांना नागपूरमध्ये अटक

0
21

blank

नागपूर, दि. २६ – कुख्यात दहशतवादी संघटना ‘इसिस’चा भारतातील धोका वाढतानाच दिसत आहे. मुंबईच्या मालवणीतील काही तरूण इसिसमध्ये सामील होण्यासाठी गेल्याची बातमी ताजी असतानाच नागपूर एटीएस अधिका-यांनी इसिसमध्ये सामील होण्यास जाणा-या तीन तरूणांना नागपूर विमानतळावर अटक केली. अब्दुल वसीम, उमर हसन फारूखी आणि माज हसन फारूख अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून ते तिघेही तेलंगणचे रहिवासी आहेत. ते तिघेही नागपूरमार्गे काश्मीरला जात असताना त्यांना अटक करण्यात आली.

blank