१ जानेवारीपासून एअर इंडियाच्या डोमेस्टिक फ्लाईटमध्ये मिळणार फक्त ‘व्हेज फूड

0
7
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. २६ –  नवीन वर्षापासून ६१ ते ९० मिनिटांच्या देशांतर्गत फ्लाईट्समध्ये फक्त शाकाहारी अन्नपदार्थ देण्याचा निर्णय एअर इंडिया प्रशासनाने घेतला आहे. येत्या १ जानेवारी पासून हा नियम लागू होणार आहे.
याप्रकरणी एअर इंडिया प्रशासनातर्फे केबिन क्रूसाठी एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ‘ १ जानेवारी २०१६ पासून एअर इडियांच्या देशांतर्गत ( ६१ ते ९० मिनिटे कालावधी) उड्डाण करणा-या विमानांच्या इकॉनॉमी क्लासमध्ये फक्त शाकाहारी जेवण देण्यात येईल. तसेच दुपारी व रात्रीच्या जेवणाच्या वेळात उड्डाण करणा-या फ्लाईट्समध्ये चहा किंवा कॉफीचा समावेश नसेल’, असे २३ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले असून त्यावर एअर इंडियाचे जनरल मॅनेदर कॅ. डी. एक्स.पेस यांची स्वाक्षरी आहे.