व्यक्तिमत्त्व विकासासाठी भारतीय छात्र संसद-अभिलाष मोहंती

0
9

गोंदिया- : माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्र्हनमेंट, पुणे व भारतीय छात्र संसद फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसांच्या भारतीय छात्र संसदेचे २७, २८, २९ ते ३० जानेवारी २०१६ दरम्यान पुणे ङ्कहाराष्ट्र येथे आयोजन केले आहे. भारतीय छात्र संसद ही संघटना प्रशिक्षित तरुण, राजकीय नेते घडविणारे व्यासपीठ आहे.विद्याथ्र्यांनी पुणे येथे आयोजित संसदेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा संघटक अभिलाष मोहंती यांनी केले. २०११ पासून दरवर्षी छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून छात्र संसदेचे हे सहावे वर्ष आहे. भारत सरकारच्या केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, तसेच मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होणार आहे. सहाव्या छात्र संसदेचे उदघाटन २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता,तर ३० जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता संसदेचा समारोप होणार आहे. विद्याथ्र्यांनी छात्र संसदेत उपस्थित राहून व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणावा, असे आवाहन अभिलाष मोहंती यांनी केले. सहभागाकरिता आपापल्या महाविद्यालयांतील प्राचार्यांशी संपर्क करावा, असे मोहंती म्हणाले.