33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय एका वर्षातच गोंदिया जिल्ह्याचे दोन पालकमंत्री ईड़ीच्या कोठडीत

एका वर्षातच गोंदिया जिल्ह्याचे दोन पालकमंत्री ईड़ीच्या कोठडीत

0
207

blank

गोंदिया,दि.23 –गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान पालकमंत्री व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक या दोघांनाही ईडीने अटक केली. हे दोघेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे गोंदियाचे पालकमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ईडीची कारवाई, हे समीकरण आहे की योगायोग, असा प्रश्‍न आता चर्चिला जाऊ लागला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर सलग दोन वेळा आणि ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे पुढे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणी स्वीकारेल की नाही, असा प्रश्‍न जिल्ह्यातील जनतेला पडलेला आहे.त्यातच स्विकारलेला व्यक्ती ईडीचा बळी तर होणार नाही ना अशा चर्चा सुरु झालेल्या आहेत.
विशेष म्हणजे, ईडीकडून अटक होणारे हे दोन्ही नेते राष्ट्रावादी कांग्रेस पक्षाशी संबधित आहे. गोंदियाचे पालकमंत्री राहिलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आणि आता विद्यमान पालकमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आता ईडीने अटक केली आहे.गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रावादी सत्ता असताना कॅबिनेट मंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी 2005 ते 2009 व 2009 ते 2014 या साली गोंदियाचे पालकमंत्री पद भूषविले. पुन्हा महाविकास आघाडी सरकार तयार होताच 2019 साली ते राज्याचे गृहमंत्री झाले. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांनी भूषविले. मात्र माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडून 100 कोटी वसुलीच्या आरोपांखाली त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. आता ते ईडीच्या कैदेत आहे. त्यांच्या अटकेनंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी मे 2021 मध्ये विराजमान झाले.मात्र अवघ्या 9 महिन्यातच त्यांनाही ईडीने जमीन खरेदी विक्री प्रकरणात त्यांना आज अटक केली.विशेष म्हणजे आधीच गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल हे विमानतळ प्रकरणात व मुंबई येथील सीजे हाऊसच्या जागेच्या खरेदी प्रकरणात ईडीच्या चौकशीला सातत्याने सामोरे जात असताना गोंदियाचेच सलग दोन पालकमंत्री असलेले राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना झालेली  अटक केवळ योगायोग की काय अशा चर्चांना उधाण आले आहे.

blank