40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home Top News गरोदर महिलेवर दरोडेखोरांचा सामूहिक बलात्‍कार

गरोदर महिलेवर दरोडेखोरांचा सामूहिक बलात्‍कार

0
36

परभणी- जिल्‍ह्यातील सेलू- पाथरी मार्गावरील खेडूला शिवारातील आखाड्यावर सोमवारी रात्री काही दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. सहा महिन्‍याच्‍या गरोदर महिलेवर सामूहिक बलात्‍कार करून माणूसकीला कलंकीत करणारे क्रुर कृत्‍य या नराधमांनी केले आहे. बलात्‍कार करण्‍यापूर्वी पीडितेला पळवण्‍याच्‍या प्रयत्‍नात दरोडेखोरांनी महिलेसोबत तिघांवर धारदार शस्‍त्राने हल्लाही केला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्‍यात घेतले आहे.

दरोडेखोरांनी खेडूला शिवारातील एका आखाड्यावर रात्री दरोडा टाकला. नराधमांची येथील एका गर्भवती महिलेवर नजर गेली. त्‍यांनी महिलेला उचलून नेण्‍याचा प्रयत्‍न केला. पण पीडित महिला त्‍यांचा प्रतिकार करू शकली नाही. महिलेचे अपहरण करून दरोडेखोरांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. माणूसकीला कलंकीत करणा-या या कृत्‍यानंतर राज्‍यभरात संताप व्‍यक्‍त केला जात आहे. या धक्‍कादायक घटनेनंतर आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पीडित महिला व जखमींवर परभणीच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.