संसद आणि आर्मी हेडक्वार्टर्स लश्कर ए तोयबाच्या निशाण्यावर

0
20
वृत्तसंस्था 
नवी दिल्ली दि. २९ –  नवीन वर्षाच्या निमित्ताने दहशतवादी दिल्लीत हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. इंटलिजन्स ब्युरोने याबाबत अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसद, आर्मी हेडक्वार्टर्स आणि संरक्षण मंत्रालय यांना लश्कर ए तोयबा लक्ष्य करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातून लश्करचे 20 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
– नरेंद्र मोदींबाबत सुरक्षा संस्थांनी अलर्ट देण्याची ही पहिलीच वेळ नाही.
– 6 डिसेंबरला दिल्ली पोलिसांच्या एका एफआयआर मध्येही लश्कर दिल्लीत हल्ल्याचा कट रचत असल्याचे उघड झाले होते. मोदींसह, व्हीव्हीआयपी त्यांच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले होते.
– त्यापूर्वी आयबीने ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुरक्षा संस्थांना इशारा दिला होता. त्यात दहशतवादी एअर इंडियाच्या काबूल-दिल्ली फ्लाइटवर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.