
सडक अर्जुनी,दि.२६: तालुक्यातील ग्राम पंचायत घाटबोरी/तेली मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतंर्गत सुरु असलेल्या पाणीटाकी बांधकामाच्यावेळी टाकीचे स्लँब कोसळल्याची घटना 25 फेबुवारीला सायकांळी 4 वाजेच्या सुमारास घडली.याघटनेत त्या कामावरील कामगार थोडक्यात बचावल्याने जिवितहानी टळली,मात्र बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 65 लाख रुपये किमतीच्या या योजनेवर आत्तापर्यंत 45 लाख रुपये खर्चे झाले असून बांधकामाच्यावेळी टाकीची जेव्हा स्लॅब घालण्यात आली त्यावेळी कंत्राटदाराने केलेले दुर्लक्षही महत्वाचे ठऱले आहे.





