
नागपूर,दि.04ः- नागपूर वनविभागार्तंगत बुटीबोरी वनपरिक्षेत्रातील चारगाव, उपक्षेत्रातील सुराबर्डी नियतक्षेत्राच्या संरक्षित वन कक्ष क्रमां. ३१४ मध्ये बिबट्या मृतावस्थेत वनकर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान दिसून आले.त्यानंतर सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाèयांना कळविल्यानंतर अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. यावेळी सदर परिसरात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनर्ध प्राधिकरण – एनटीसीएच्या मानक आधारभुत प्रणालीनुसार कार्यवाही करीत घटनास्थळापासून १ किमी परिसराची कसून तपासणी करण्यात आली. शिवाय बिबट आजरी व भुकेने व्याकुळ असल्याचे गावकऱ्यांनी आणि वनकर्मचाऱ्यांनी पाहिले होते.ते मात्र काही अंतरावर गेल्यावर बिबट्याने आपले प्राण सोडले. घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. यावेळी सहा.वनसंरक्षक एन.जी.चांदेवार,वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही.ठोकळ, पशुवैद्यकीय चमू डॉ. प्रमोद सपाटे, डॉ. स्मिता रामटेके, डॉ. मुगाली महल्ले, डॉ. सुदर्शन काकडे आदी उपस्थित होते.ते याशिवाय एनडीसीएचे प्रतिनिधी उधमसिंह यादव,पीसीसीएफ वन्यजीवाचे प्रतिनिधी शुभम राउत आदी उपस्थित होते. सदर कार्यवाही मुख्य वनसंरक्षक प्रादे. वनवृत्त युवराज, उपवनसंरक्षक् डॉ.भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
बिबट्याच्या शरीरावर जमखा
सदर बिबट ८ ते १० दिवसाआधी वन्यप्राण्यासोबतच्या झूंजीत जखमी झाला होता. त्यामुळे तो आजारी आणि भुकेने व्याकुळ देखील होता.परिणामी या बिबट्याचा मृत्यू झाला असा अंदाज यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मृत बिबट्याच्या डोक्यावर, कानावर व इतर भागारवर ओरखडलेले स्वरुपाच्या खुणा आढळल्या. या बिबट्याचे शवविच्छेदन करुन नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.





