
गोंदिया- येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरु केले आहे.या अभियानांतर्गत पुर्व विदर्भातील ३२ विधानसभा मतदारसंघाला लक्ष्य ठेवण्यात आले असून शिवसैनिकांच्या समस्या अडचणी जाणून घेत पक्ष मजबुतीसाठी काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी गाव तिथे शाखा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्ह्याचे संपर्क नेते खासदार राजन विचारे यांनी पत्रपरिषदेत दिली.सोबतच राज्यातील एमआयए‘ हा पक्ष देशद्रोही पक्ष असून त्यांना राष्ट्रहितापेक्षा व्देषाचे राजकारणच अधिक आवडत असल्याने त्यांच्यासोबत शिवसेनेचा युतीचा प्रश्नच उदभवत नसल्याचेही खा. विचारे म्हणाले.
कोरोनामुळे दोन वर्ष अशीच गेली,तरीही राज्यातील महाविकास आघाडीने जनतेत चांगले काम केल्यामुळेच मुख्यमंत्री पहिल्या पाच मध्ये आहेत.आत्ता कोरोना संपत आला असून विकास कामांना सुरवात होणार आह. त्यातच गावपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने केलेले कार्य घराघरांत पोहोचवून शिवसंपर्क अभियान यशस्वीपणे राबविण्यातसाठीच आपण गोंदिया जिल्ह्यात सतत ४ दिवस सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून त्यांचे सर्व म्हणने पक्षप्रमुखांना सांगितले जाणार आहे.या अभियानाकरीता ते जिल्ह्यात आज पहिल्यांदाच आले असता येथील विश्रामगृहात पत्रकारांशी सवांद साधला .
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ,सहसंपर्क प्रमुख मुकेश शिवहरे,जिल्हाप्रमुख पंकज यादव,सुरेंद्र नायडू, सुनिल लांजेवार,विकास यकर,गणेश सानप,प्रिती देशमुख,दिलीप कदम,शिवाजी झोरे,परशुराम जाधव आदी उपस्थित होते.
युवकामध्ये नेतृत्व गुण निर्माण करण्याची ताकत ही फक्त शिवसेनेच्या विचारात आहे. शिवसेना हा तरुणांचा पक्ष आहे, तरुणांच्या रक्तामध्ये विचार रुजविण्याचे काम बाळासाहेब ठाकरे त्यांनी त्यावेळी केले होते. तेच काम आज पर्यंत सुरू आहे.शिवसेनेचे ताकत वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगत राज्यात महाविकास आघाडी चांगले काम करीत असून इतर राज्यात झालेल्या निवडणुकामधून आम्ही पक्षाची त्या राज्यात सुरवात केल्याचे सांगत आमची तर सुरवात आहे,परंतु जे सत्तेत होते,त्यांच्या जागा का कमी झाल्या त्याचे त्यांनी आत्मचिंतन करावे असेही विचारे म्हणाले.





