37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News छत्‍तीसगडमधील रायगडमध्‍ये नरबळी

छत्‍तीसगडमधील रायगडमध्‍ये नरबळी

0
40

blank

वृत्तसंस्था
रायगड,दि. ७ – छत्‍तीसगडमधीलल रायगड जिल्‍ह्यामधील भगवानपूर परिसरात एका 12 ते 15 वर्ष वयोच्‍या मुलाचे शिर अणि धड काहीच अंतरावर आढळून आले. बाजूलाचा पूजेचे साहित्‍य आणि दारूच्‍या बॉटलही होत्‍या. त्‍यामुळे हा नरबळीच असल्‍याची चर्चा परिसरात होत असून, खळबळ उडाली आहे. हत्‍या झालेला मुलगा कोण आणि कुठला, याचा तपास पोलिस करत आहेत.
 एका मुलाचा कुणीतरी शिरच्‍छेद केल्‍याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्‍थळी पोचले. पोलिसांसोबत फॉरेंसिक टीम आणि डॉग स्क्वाडची टीमसुद्धा होती. 100 मीटरच्‍या अंतरावर धड आणि शिर होते. हा नरबळीचा प्रकार  असून, तपास सुरू असल्‍याची माहिती पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली. परिसरातील कुणी लहान मुलगा गायब आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनास्‍थळावर असलेल्‍या दारूच्‍या बॉटल आधारे हे कृत्‍य तीन ते चार लोकांनी केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्‍यक्‍त केले.

blank