कुस्‍तीपूर्वी 2 पैलवान उत्‍तेजक इंजेक्शन घेताना पकडले

0
6
नागपूर – नागपुरात मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्‍या पहिल्‍याच दिवशी डोपिंगचे प्रकरण समोर आले आहे. दोन कुस्तीगिरांना उत्तेजकांची इंजेक्शन्स घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्‍हणजे स्‍पर्धेच्‍या उद्घाटनापूर्वीच हा प्रकार समोर आला आहे. या कुस्‍तीगिरांकडून इंजेक्शन ताब्‍यात घेण्‍यात आले आहेत.
उद्धाटनाचा कार्यक्रम होण्‍याआधीच हा प्रकार समोर आल्‍याने महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेला गालबोट लागल्‍याचे बोलले जात आहे् आयोजन समितीचे सदस्य दीपक खिवरकर यांनी त्या पैलवानांकडून इंजेक्शन्स ताब्यात घेऊन ही बाब पंच समितीच्या निदर्शनास आणली. स्पर्धेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे संघ नागपूरच्या चिटणीस पार्कमध्ये दाखल झाले आहेत. स्पर्धेसाठी 100 पंचही नागपूरात पोहोचले आहेत.