तुकडोंजीच्या पालकीयात्रेने दुमदुमणात भजेपार 

0
12
पुण्यतिथी सप्ताह निमित्त भरगच्च कार्यक्रम
सालेकसा – तालुक्यातील भजेपार येथे अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडाळाचे वतीने ११ ते १७ जानेवारी दरम्यान तुकडोजी महाराज ध्यान मंदिराच्या प्रनांगनात सात दिवसीय ग्रामगिता श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह तथा तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सातही दिवस भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा १२ वा पुण्यतिथी महोत्सव ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. ११ जानेवारीला उद्घाटन प्रसंगी ग्रंथ दिंडी तथा तुकडोंजीची पालकीयात्रा गांव भ्रमण करणार आहे यानंतर दुपारी पर्यावरण मार्गदर्शन शिबीरला आमगावचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.बी.अवगाल संबोधित करणार आहेत. १२ जानेवारीला दुपारी ११.३०वाजता जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांचे प्रमुख उपस्थितीत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर आणि यशस्वी विद्यथ्र्यांचा सत्कार होईल. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा कृषीअधिक्षक अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणुन आमगाव येथील उपविभागीय पोलिसअधिकारी  दिपाली खन्ना उपस्थित राहणार आहेत. १३ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता पासुन प्रसिध्द हृदय रोगतज्ञ डॉ. एल.एल.बजाज आणि त्यांची चम्मू यांच्या उपस्थिीत भव्य आरोग्य शिबीर व मोफत औषधी वितरण होणार आहे. १४ जानेवारीला गुरूवुंâज मोझरी आश्रम येथील ग्रामगिताचार्य शेलोटकर महाराजांचे ग्रामगिता प्रवचन तर १५ जानेवारीला भव्य महिला मेळावा हळदीवुंâवूâ कार्यक्रम जि.प. अध्यक्षा उषा मेंढे यांचे अध्यक्षतेखाली होईल. १६ जानेवारीला सकाळी ११ वाजता पासून कायदेविषयक मार्गदर्शन होईल. १७ जानेवारीला सकाळी ८.३० वाजता राष्ट्रसंताची पालखी शोभा यात्रा, गावदिंडी जनजागृती रैलीचे भव्य आयोजन माजी मंत्री भरत भाऊ बहेकार यांचे अध्यक्षतेखाली होणार असून ग्रामगिताचार्य रायजीप्रभु शेलोटकर यांचे हस्ते गोपालकाला आणि कार्यक्रमाचा समारोप होईल. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहून ग्रामगितेचे अमृत प्राशण करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.