
गोंदिया,दि.01ः- केंद्र शासनाने लागू केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने गोंदियातील शेंडेबंधू पेट्रोलपंर येथे आज शुक्रवारी ता.1 दुपारी पेकेक कापून आंदोलन केले. यावेळी पंतप्रधानाचा विकासाचा एप्रिल फूल दिवस असा फलकही लावण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, माजी नगरसेवक सचिन शेंडे, सुनिल भालेराव, शंकर टेंभरे, शैलेश वासनिक, कान्हा बघेले, बालु कोसरकर, रमन उके, सौरभ गौतम, एकनाथ वहिले, सौरभ रोकडे, विनायक शर्मा, लव माटे, दर्पन वानखेडे, विक्की बाकरे, अविनाश महावत, नरेंद्र बेलगे, रौनक ठाकुर, प्रतिक भालेराव, योगी येडे, पिंटु कटरे, आकाश नागपुरे, कपील बावनथडे, शरभ मिश्रा, कुनाल बावनथडे, प्रफुल उके, शिवलाल नेवारे, प्रतिक पारधी, गुणवंत मेश्राम, विक्रांत तुरकर, राज शुक्ला, मंगेश रंगारी, पिंकी चौरसिया, अर्पित मेश्राम, यश खोब्रागडे, श्रीकांत मेश्राम, श्रेयस खोब्रागडे, लोकेश किरणापुरे, हर्षवर्धन मेश्राम, कुंडलिक माने, प्रफुल मेश्राम, अमित मेश्राम, अजय शेडे, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधानांनी दाखविलेले अच्छे दिनचे स्वप्न पार धुळीस मिळवले असून वारंवार होणारी इंधन दरवाढ सर्वसामान्यांसाठी अडचणीत ठरू लागली आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीची कामेही ठप्प होऊ लागली आहेत. शासनाने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा दिवस एप्रिल फुल असे फलक घेऊन त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. केंद्र शासनाने इंधन दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास राज्यभरात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.





