33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ नाला सरळीकरणाचे काम न करताच लाखोची अफरातफर

नाला सरळीकरणाचे काम न करताच लाखोची अफरातफर

0
84

blank

गोंदिया- गावातील मजुरांना गावातच काम मिळावे, या उद्देशाने मनरेगाची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेतंर्गत पांदण रस्ते, नाला सरळीकरण, तलाव खोलीकरण असे आदि कामे केली जातात. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणारे रोजगार सेवक व यंत्रणेचे अधिकारीच काम न करता लाखो रूपयांची अफरातफर करीत असल्याचा प्रकार पोवारीटोला या गावात समोर आला आहे. सन २0२१-२२ मध्ये मंजूर नाला सरळीकरणाचे काम झाले नसतानाही मस्टरमध्ये दाखवून त्यावरची कुशल व अकुशल कामाचा निधी उचल करण्यात आला आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
सविस्तर असे की, गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पोवारीटोला येथे मनरेगा अंतर्गत सन २0२१-२२ मध्ये शेतकरी कुरंजेकर ते रूपचंद चौधरी यांच्या शेतापयर्ंत नाला सरळीकरणाचे काम मंजूर झाले होते. नियमानुसार हे काम प्रत्यक्षात झालेच नाही. मात्र, रोजगार सेवक तारकेश्‍वर नानाजी चौधरी यानी २१ फेब्रुवारी २0२२ ते ६ मार्च २0२२ या कालावधीत नाला सरळीकरणाचे काम झाल्याचे दर्शवून बोगस हजेरी पथक सादर केले. या बोगस प्रकाराला यंत्रणेच्या अधिकार्‍यांनीही सहकार्य केले. बोगस कामाच्या हजेरी पत्रकाला मंजूरी प्रदान करीत रोजगार सेवक व यंत्रणेच्या संगनमताने लाखो रुपए उचल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे मनरेगा अंतर्गत यंत्रणेचा सुरू असलेला मालसुतो कार्यक्रम चव्हाट्यावर आला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आयुक्त नागपूर, खा.सुनिल मेंढे, आ.विनोद अग्रवाल यांना गावातील सुज्ञ नागरिक सुनिल ब्राम्हणकर, पोलिस पाटील ओमेश्‍वर चौधरी, मोतीलाल आंबेडारे, सेवक चौधरी, रामदयाल रहांगडाले, लक्ष्मीबाई गायधने यांनी स्वाक्षरीनिशी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशीनंतर दोषीवर कोणती कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

blank