
अर्जुनी मोर. :-भारतिय जनता पक्ष हा शून्यातून विश्व निर्माण करणारा पक्ष असुन दोन खासदारा पासुन सुरवात करणारा हा पक्ष जगातला नंबर एक पक्ष ठरला आहे. यामधे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे फार मोठे योगदान आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीतुन वाटचाल करीत भाजप हा प्रचंड वटवृक्ष झाला आहे. समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्तींचा विकास आणी राष्टसेवा या उद्देशाने कार्य करणारा जगातील सर्वात मोठा पक्ष, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निरंतर जनसेवेचे कार्य करणा-या सर्व पदाधिकारी, आणी कार्यकर्ते यांना भाजपा स्थापना दिनी शुभेच्छा देवुन यापुढे बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी सेवा व समर्पणाची भावना लक्षात घेऊन काम करावे असे आवाहन भाजपाचे जेष्ठ नेते माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
भाजपा स्थापना दिनाचे औचित्य साधून सडक अर्जुनी येथे आयोजित अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रांतील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री राजकुमार बडोले बोलत होते. अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रांत माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे मार्गदर्शनात भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व बुथप्रमुख व शक्तीकेद्र प्रमुख, भाजपा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरांवर भाजपा चे ध्वज फडकविला.





