
गोंदिया-एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्ह्याला द्वितीय क्रमांकाने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दिनांक ४ में रोजी पुणे येथील यशदा सभाग्रुहात झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात आरोग्य व कुटुंब कल्याण संचालक डॉ. अर्चना पाटील, माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे ,सहसंचालक डो. स्वप्निल लाळे, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट काम करणारया प्रथम पाच जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्हा एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम उपस्थितीत चमु जिल्हा सर्वेक्षण साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. सुशाकी कापसे, डाटा मॅनेजर मंजू रहांगडाले, डाटा मॅनेजर मनीषा देशमुख यांच्या चमू यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात आली आहे. एकात्मिक सर्वेक्षण कार्यक्रमाची ऑनलाइन पोर्टल वर फॉर्म एस. फॉर्म पी. व फॉर्म एल. पोर्टलवर दैनंदिन रुग्ण संख्या अद्यावत, कोविड हॉटस्पॉटची माहिती देणे यासह अन्य तांत्रिक निर्देशांकावर पुरस्कारची गुणांक करण्यात आली आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने सामूहीक प्रयत्न केले असून, त्याचे यश म्हणून जिल्ह्याला पुरस्कार मिळाला असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी म्हटले आहे. सदर कार्यक्रमात भंडारा जिल्ह्याला प्रथम पुरस्कार, लातूर जिल्ह्याला तिसरा पुरस्कार, गडचिरोली जिल्ह्याला चौथा क्रमांक सांगली जिल्ह्याला पाचवा क्रमांक पुरस्कार देण्यात आला आहे.
हा कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्यासाठी जिल्हाधिकारी नयना गुडे, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिश मोहबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, के.टी.एस.निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. जैस्वाल, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकिय अधीक्षक या सर्वाच्या मार्गदर्शनात सर्व आरोग्य यंत्रणेने सामूहिक प्रयत्न केल्याने जिल्ह्याला पुरस्कार मिळालेला आहे. सदर कार्यक्रमाची अमंलबजावणी गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, आमगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रोशन राऊत, तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती घोरमारे, सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित कोंडणकर, देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे, सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षदीप मेर्शाम, गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत यांनी आपआपल्या तालुक्यात एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केल्याने त्याचे फळ जिल्ह्याला मिळाले आहे.





