37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय भंडारा जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष मात्र भाजपाचाच?

भंडारा जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष मात्र भाजपाचाच?

0
151

blank

 भंडारा- जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर बराच काळ खोळंबलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड आज मंगळवारी (१0 मे) होत आहे. या निवडणुकीत कोणते नवे समिकरण पुढे येतात, याची उत्सुकता लागली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे जिल्हा परिषदेतसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होईल, हे स्पष्ट होते. परंतु, ६ मे रोजी पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीत काँग्रेससोबत जाण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत चूल मांडली. काही दिवसापुर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चोरखमारा येथे काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करेल किंवा विरोधी बाकावर असेल अशी स्पष्ट भूमिका जाहिर केल्यानंतर राष्ट्रवादीने आपल्या भूमिकेत बदल केल्याचे बोलले जात आहे.पटोलेंच्या अधिक बोलण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता निष्ठावंत काँगेसी व्यक्त करीत आहेत.

राष्ट्रवादीने त्यांच्या परंपरागत मित्र असलेल्या काँ ग्रेसला बाजूला जू ठेवत भारतीय जनता पार्टी सोबत समेट घडवीत अनेक ठिकाणी सत्ता काबीज केली. जिल्हा परिषद निवडणुकीचे हे ट्रेलर असल्याचे तेव्हा सांगितले जात होते.ते त्यादृष्टीने जवळपास प्रयत्नही पूर्ण झाले होते.ते परंतु याच पंचायत समिती निवडणुकीत तुमसर येथे झालेला गोंधळ भाजपच्या गटबाजीचे दर्शन करून गेला. भाजपचे 6 सदस्य त्यांच्या खेम्यातून घरी परतले. घरी परतले नाही तर त्यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णयर्ण ही जाहीर केला.
अध्यक्षपदाचा खरा दावेदार संख्याबळ पाहता काँग्रेसचा आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात कधीही न झालेले सख्य आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमेकांना कमी लेखण्याची असलेली चढाओढीमुळे वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न सुरू झाला. आणि त्यातूनच राष्ट्रवादी आणि भाजपा अशा सत्ता समीकरनाची दिशा मिळाली. 13 आणि 12 अन्य एका पक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेचे सिंहासन काबीज करण्याचा जवळपास प्रयत्न यशस्वी झाला असताना चरण वाघमारे यांच्या गटातील सदस्यांनी घेतलेली भूमिका समीकरण बदलण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

परिणामी, संधी असूनही अनेक पंचायत समितीमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले. हा प्रकार जिव्हारी लागल्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपच्या एका गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. भाजपचा हा गट भाजपचेच माजी आमदार चरण वाघमारे यांचा आहे. हा गट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे, काँग्रेस आणि भाजपचा एक गट मिळून सत्तेचे समिकरण पुढे येण्याची शक्यता आहे.
तथापि, भाजपच्या या गटाची मनधरणी केल्याची माहिती पुढे आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे आमदार आणि खासदार यांची बैठक झाली. यावेळी माजी आमदार चरण वाघमारेसुद्धा होते. याच बैठकीत भाजपचे प्रदेश सरटिचणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नेमके कोणते समिकरण ठरविण्यात आले, हे निवडणुकीनंतरच समोर येणार आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस २१, राष्ट्रवादी काँग्रेस १३, भाजप १२, शिवसेना १, अपक्ष ३, वंचित १, बसपा १ असे पक्षीय बलाबल आहे. कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी नैसर्गिक आघाडी होणार की कॉंग्रेस आणि भाजपचा एक गट किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप हे समिकरण पुढे येणार, हे निवडणुकीअंतीच स्पष्ट होणार आहे.

blank