
अर्जुनी-मोर -अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची सभा 13 मे रोज शुक्रवारला दुपारी 11.00 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे खुले सभागृहात आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव माजी आमदार राजेंद्र जैन तसेच जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचे प्रमुख मार्गदर्शनात आयोजित केली आहे.सभेमध्ये सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा, पक्षसंघटना बाबत चर्चा ,तालुक्यातील विकास कामाबाबत चर्चा इतर विषयाचा यावेळी आढावा घेतला जाईल. यावेळी गोंदिया जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर, अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे ,नगरपंचायत सभापती, नगरसेवक व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी ,लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लोकपाल गहाणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.





