41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढणार

मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढणार

0
26

blank

शिक्षणाधिकारी कादर शेख यांचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेला आश्वासन

गोंदिया,दि.13ः मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी दि. १२ मे रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात कादर शेख शिक्षणाधिकारी (प्राथ. तथा माध्य.)यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
शिक्षणाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन शेख यांनी दिले.

जि.प. प्राथ. /माध्य. /उच्च माध्य. शिक्षकांची बिंदुनामावली तयार करणे, उ.श्रे.मुख्या./मा.मुख्या/केंद्र प्रमुख/शिक्षण विस्तारअधिकारी पदांची बिंदूनामावली निश्चित करून पदोन्नती करणे, शिक्षकांचे चटोपाध्याय श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करणे, सातव्या वेतन आयोगाचा थकबाकीचा दुसरा /तिसरा हप्ता भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करणे व डीसीपीएस/एन.पी.एस धारकांना रोखीने देणे, शिक्षकांचे स्थायी आदेश, उच्च परीक्षा व कार्योत्तर परीक्षा परवानगी आदेश, मराठी/ हिंदी सुट प्रकरणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढणे, एन.पी.एस. खाते उघडलेल्या शिक्षकांच्या खात्यावर मागील डी.सी.पी.एस कपात राशी वर्ग करणे , २०२३ ला सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची सेवापुस्तका मागवून तपासून बरोबर करणे आदी मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळात महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, श्रीकांत जनबंधू, वीरेंद्र भोवते, किशोर डोंगरवार, नरेश गोंडाणे, उत्क्रांत उके, दिलीप रामटेके, जगदीश मेश्राम, पी.एन. जगझापे, दिनदयाल मेश्राम, रविंद्र मेश्राम, जी.एस. बावनकर, अजय शहारे, अविनाश गणवीर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

blank