गोंदिया,दि.११- जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र घोनाडी येथे आकस्मिक भेटी देऊन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण व क्षयरोग विभागाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी भेटी दरम्यान आरोग्यवर्धिनी केंद्र घोनाडी येथील प्रसुतीगृह,प्रयोगशाळा,माहेरघर,
कार्यक्षेत्रातील गावे हे अतिदुर्गम व जंगलव्याप्त असल्याने हिवतापाबाबतची साथ उदभवु नये म्हणुन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे,कीटकजन्य,जलजन्य आजार तसेच साथीच्या रोगाबाबत उपाययोजना करणे,कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कामे वाढवणे,आरोग्य केंद्र प्रसुतीचे प्रमाण वाढविणे,दि.1 जुलै ते 31 जुलै दरम्यान डेंगू प्रतिरोध महिना साजरा करुन प्रतिबंधात्मक उपायोजना करणे,गुणवत्तापुर्वक किटकनाशक फवारणी करणे, कार्यक्षेत्रातील 100 टक्के अंडवृद्धी शस्त्रक्रीया होण्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय देवरी येथे भरती करणे,आश्रमशाळा व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आर.डी.के.किट द्वारे रक्त तपासणी करणे,स्थलांरतीत लोकांचे यादी अद्यावत करुन पत्ता सिजन कामावरुन गावी परतलेल्या लोकांचे हिवतापाबाबत तपासणी करणे,हत्तीपाय रोग ग्रेड-3 वरील रुग्णांना अपगंत्व प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे नियोजन करणे,आरोग्य संस्थेत हिवताप बाबतचे रक्त नमुने बँकलॉग ठेवु नये,हिवतापाबाबत गप्पी मासे व लारवा यांचे शाळेत प्रात्यक्षिक जनजागृती कार्यक्रम घेणे ई.विविध बाबी सोबतच लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या द्रुष्टीकोनातुन सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात आल्या.त्यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता नियमितपणे करणे,सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहुन आरोग्य सेवा देणे,आरोग्य संस्थाचे रेकॉर्ड अद्यावत करणे,बाह्यरुग्ण सेवा(ओपीडी) दरम्यानच्या वेळेत रुग्णांना वेळेत चांगल्या सोयी देण्यात याव्यात,क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन करणे,पर्यवेक्षांनी उपकेंद्रांना भेटी देवुन सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेण्यात यावा, हलचल रजिस्टरवर नोंदी करुनच मुख्यालय सोडावे. सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी. कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,गरोदर मातेला प्रसुतीपुर्व व प्रसुतीपस्चात नियमित सेवा देणे,एन.सी.डी. कार्यक्रम अंतर्गत कार्यक्षेत्रातील 30 वर्षावरील महिला व पुरुषांची तपासणी करणे,आरोग्य विषयक जनजागृती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे, तसेच सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचे आढावा घेवून उदिष्ट निहाय कामाची प्रगती असावी या बाबत सुचीत करण्यात आले.
भेटी दरम्यान क्षयरोग विभागाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी क्षयरोग बाबत होत असलेल्या कामकाजाची पाहणी केली.जिल्ह्यात क्षयरोगबाबत विविध ईंडीकेटरनुसार क्षयरोग कार्यक्रम राबवुन लोकांना अविरत आरोग्य सेवा देण्याबाबत सुचना दिल्यात.यात प्रामुख्याने विविध लक्षणेनुसार संशयित क्षयरोग आजाराचे रोगी शोधणे,शोधलेल्या संशयित क्षयरोग लोकांचे आरोग्य संस्थेत थुंकी नमुने किंवा एक्स-रे तसेच विविध प्रयोगशाळा तपासणी मोफत करणे.क्षयरोग निघालेल्या रुग्णांना नि:शुल्क औषधोपचार सुरु करणे,औषधोपचार दरम्यान फॉलोअप ठेवणे,समुपदेशन करणे,निक्षय पोर्टलवर नोंदणी करणे,निक्षय पोषण योजनेचा लाभ देणे,रुग्णांचे दस्तावेज ऑनलाईन करणे,सहवासी लोकांचे तपासणी व औषधोपचार,टिबीग्रस्त लोकांना कुठल्याही औषधांचा आरोग्यावर दुष्प्रभाव न होवु देणे,टि.बी. मुक्त ग्रामपंचायत अशा विविध बाबींचा आढावा घेवुन सुचना देण्यात आल्या.
भेटी प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र घोनाडी येथील आरोग्य सहाय्यक रितेश सार्वे व ईंद्रकुमार पालीवाल,आरोग्य सेविका सरिता पारधी,आरोग्य सहायिका खेडेकर,परिचर राठोड व ईतर कर्मचारी उपस्थित होते.