
सडक अर्जुनी,दि.15ः- तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सडक/अर्जुनी च्या वतीने एरिया ५१, कोहमारा येथे तालुक्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मासिक सभा, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी नवनिर्वाचित जि.प. उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सडक/अर्जुनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना राजेंद्र जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभासद नोंदणी अभियानाची समीक्षा करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी अशी सूचना यावेळी करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार श्री जैन म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनतेच्या हिताकरिता पक्ष सदैव तत्पर आहे. गॅस सिलेंडर, पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सातत्याने होणारी दरवाढ यामुळे महागाई ने उच्चांक गाठला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक खतांच्या किमतीत व मशागती चा खर्च यात होत असलेली भरमसाठ वाढ हि सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडणारी आहे. राज्य सरकारकडून रब्बी हंगामातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाच्या खरेदी करिता केंद्र सरकारद्वारे होत असलेली शेतकऱ्यांची अडवणूक या सर्व समस्यांविषयी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व सामान्य जनतेच्या हिताकरिता प्रयत्न करू असे प्रतिपादन श्री जैन यांनी केले. या सभेला सर्वश्री राजेन्द्र जैन माजी आमदार, गंगाधर परशुरामकर जिल्हाध्यक्ष, यशवंत गनवीर, अविनाश काशिवार, तेजराम मड़ावी, शिवजी गहाने, आर.बी.वाढई, डी.यू.रहांगडाले, आनंद अग्रवाल, वंदना डोंगरवार, रजनी गिऱ्हेपुंजे, शशिकला टेम्भूर्णे, कामिनी कोवे, दीक्षा भगत, अनिता बांबोर्डे, छाया टेकाम, नरेश भेंडारकार,रमेश चुर्हे, दु.चन्द्रिकापुरे, उमराव मांढरे, प्रशांत बलसंवार, राहुल यावलकर, ओमराज दखने, आनंद इडपाते, शामराव वासनिक, भैयालाल पुसतोड़े, विजय मेश्राम, रूपेश वाघमारे, सुभाष कापगते, हेमराज मेंढे, ईश्वर चूटे, अनिल झिंगरे, धनपाल बड़ोले, सदाराम लाडे, हेमराज खोटेले, चंद्रभान मेश्राम, लीलाभाऊ रहांगडाले, डॉ चौधरी, दिनेश कोरे, मुनेश्वर कापगते, घनाराम गजभिये, ईश्वर खोटेले, मोहन खोटेले, पुंडलिक लांजेवार, सचिन एसन्मुरे, खेमराज कापगते, आस्तिक परशुरामकर, राधेश्याम परशुरामकर, मंगेश कोल्हे, प्रमोद मेश्राम, चंदन मानकर, योगराज बंजे,अतुल फुके, सपनेश कोल्हे, अतुल बंसोड़, ओमप्रकाश बंसोड़, ओमेश कापगते, सहित अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.





