गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडी जिल्हाध्यक्षपदी डॉ योगेंद्र भगत

0
42

गोंदिया,दि.23ः- गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा कामाचा व्याप वाढल्याने त्यांच्या जागी खासदार प्रफुल पटेल यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष  जयंत पाटील यांच्या सम्मतीने जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ.योगेंद्र भगत यांची किसान आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे महासचिव एफ.आर.टी.शहा यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पक्षाचा राजीनामा दिल्याने त्यांचा राजीनामा पक्षांने स्वीकारून त्या ठिकाणी आदर्श गाव चिचटोलाचे प्रगतीशील शेतकरी मुनीश्वर यादवराव कापगते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे श्रेय डॉ योगेंद्र भगत व मुनीश्वर कापगते यांनी  खासदार प्रफुल पटेल व अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव व माजी आमदार राजेंद्र जैन यांना दिले आहे. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पदी व महासचीव पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी,जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणवीर,डॉ.अविनाश काशिवार, प्रेमकुमार रहांगडाले, सुरेश हर्षे, सि.के.बिसेन,जि.प.सभापती पुजा अखिलेश सेठ,सुधा रहांगडाले, लोकपाल गहाणे, केवल बघेले, कमलबापू बहेकार,कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, केतन तुरकर, किशोर तरोणे, डी.यू रहांगडाले, योगेश नाकाडे,राजलक्ष्मी तुरकर,गणेश बरडे, डॉ अविनाश जयस्वाल, प्रभाकर दोनोडे, शिवाजी गहाने, डॉ रुकिराम वाढई सहीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.