मोहाडी,दि.29ः- चॉकलेट आणण्यासाठी लहान सायकलने जात असलेल्या पाच वर्षीय बालकाला तेंदूपत्ता वाहनाने चिरडले. यात बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास तुमसर तालुक्यातील लंजेरा येथे घडली.
अंश युवराज शेंडे (५) रा. लंजेरा असे मृत बालकाचे नाव आहे. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास यश हा लहान सायकलने चॉकलेट आणण्यासाठी गावातील किराणा दुकानात जात होता. दरम्यान, तेंदूपत्ता भरुन जात असलेल्या पिकअप वाहनाने (क्र . एमएच ४0 वाय ८२३९)अंशला धडक दिली. यश सायकलसह वाहनाच्या मागील चाकात सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातनंतर वाहन चालक पसार झाला. आंधळगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.