
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपक्रमांना हरताळ
देसाईगंज दि ३०-देसाईगंज शहरातील मुख्य राष्ट्रीय महा मार्गावरील रस्त्याचे लगतचे कच्चे व पक्के अतिक्रमण हटविन्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी चांगलीच कंबर कसली होती. राष्ट्रीय महामार्ग उप विभाग भंडारा यांनी देसाईगंज येथील अतिक्रमण धारकांना २० मे ला चार दिवसांच्या मुदतीची नोटीस बजावली होती. मात्र गडचिरोली जिल्हा भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी नागपूर येथील राष्ट्रीय महामार्गावरचे कार्यकारी अभियंता कार्यालयाला फोन करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा गैरवापर करून अतिक्रमण हटाव मोहिमेला थांबविल्याची धक्कादायक माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रस्तुत प्रतिनिधीनीला सांगितले.
केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी दळणवळणा साठी राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करण्याचा सपाटा चालविला असतांनाच गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज वडसा येथुन जाणाय्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी या महामार्गावर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूला अतिक्रमण करून महामार्गाचा रस्ता निमुळता करून वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे अपघात होऊन बय्राच जणांना आपला जीव गमावला आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज शहर हे मध्यवर्ती ठिकाण असून देसाईगंज शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण अडसर ठरित आहे. केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारल्या जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद उच्चाटन करण्यासाठी दळणवळणाला प्राधान्य दिले जात असताना या विकासात्मक कामांचा गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी विरोध करीत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी सांगत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील विकास साधायचा कसा असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
साकोली-वडसा -आरमोरी ३५३ ही या राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अस्थाई पट्टेधारकांसह लहान मोठे अतिक्रमण धारकांना अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत सुचनेतील राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण ( भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ मधील नियम २६ ची उपकलम (२) च्या अधीन राहून उप विभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी ता २० मे ला नोटीस क्र Q /रा. म. ३५३ ही/वडसा/अतिक्रमण/२०२२ नुसार बजावली होती. नगर परिषद देसाईगंज यांनी शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली त्या वेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. कारवाई सुरू करणार एवढ्यात गडचिरोली जिल्हा भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा गैरवापर करून अतिक्रमण हटाव मोहिम थांबविले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.