गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणुकीनंतरची दोन वर्षानी होणारी सर्वसाधारण सभा आज ७ मे रोजी होणार होती.मात्र जिल्हा परिषदेत सत्तेचे स्पष्ट बहुमत असतानाही सभागृहात जाण्यापुर्वीच जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी सभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.पहिलीच सभा स्थगित केल्याने बहुमतातील भाजपमध्ये खातेवाटप व विषय समिती सदस्यावर तोडगा काढण्यात यश न आल्याने ही सभा स्थगित करण्यात आल्याची चर्चा आहे. तर जि प अध्यक्षांचा हा निर्णय राजकीय अपरिपक्वतेचे उदाहऱण असल्याची चर्चा सुरु झाली आहे.