नियमित वीज देयके भरणार्‍या ग्राहकांचा महावितरणकडून सत्कार

0
36

गोंदिया,दि.09ः-  ६ जून महावितरणच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त मागील वर्षभरापासून मुदतीत तत्पर वीज देयके भरणार्‍या गोंदिया मंडलातील घरगुती वीज ग्राहकांचा गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता बी. ए. वासनिक व गोंदिया मंडलाचे अधीक्षक अभियंता सम्राट वाघमारे यांचे हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
देय दिनांकापूर्वी वीज देयके भरणार्‍या ग्राहकांना १ टक्का जास्त सूट मिळते. महावितरणचे अधिकारी ग्राहकाकडे जाऊन नियमित वीज बिल भरल्याबद्दल आभार व्यक्त करत असल्याने ग्राहकांनी संतोष व्यक्त केला. सर्वच वीज ग्राहकांनी वीज देयके वेळेत भरणा करून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता बी. ए. वासनिक यांनी याप्रसंगी केले.
गोंदिया मंडलातर्फे ६ जून महावितरणच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त कामातील तणाव कमी करण्यासाठी तसेच एकमेकाप्रती स्नेहभाव अधिक प्रबळ व्हावा म्हणून कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता विविध खेळ व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महावितरणचे अधिकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.