दहा वर्षीय मुलीने वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा

0
28

चिचगड ,दि.15: वृक्षाला खूप मोठे महत्त्व असून संत तुकाराम महाराजांनी तर आपल्या अभंगामध्ये वृक्षांचे महत्त्व सांगताना “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” असे म्हटले आहे. समाजात जशी आपली जवळची माणसे आनंद व सुख देतात तसेच वृक्ष सुद्धा सुख देतात.त्याचा आधार घेत देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत भर्रेगांव येथील ग्रामपंचायत सदस्य योगराज साखरे यांची मुलगी आरोही योगराज साखरे रा. नवाटोला (वय १०) हिने आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करुन वेगळा संदेश दिला आहे.आरोही छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा देवरी येथे शिक्षण घेत असून हिने बाजारातून मातीचे भांडे आणून लागणारे खाऊचे पैसे त्या मातीच्या भांड्यामध्ये गोळा केले. तिला पर्यावरणसबंधित चित्रांची  आवड असल्यामुळे वाढदिवसानिमित्त विहारात गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून १० वृक्ष लावले.यावेळी देवरी पंचायत समितीचे सदस्य प्रल्हाद सलामे, भर्रेगांव ग्रामपंचायत सरपंच लखनलाल पंधरे, ग्राम पंचायत सचिव सी.आर.चाचेरे,उपसरपंच जयेंद्र मेंढे, ग्रामपंचायत सदस्य नंदलाल नेताम ,ग्रामपंचायत सदस्य योगराज साखरे, रामेश्वर कुमोटे,संतोष खोटेले, दिलीप बडोले ,डालचन्‍द मडावी, रेवचंद खोटेले, वैभव कोचे सरिता रहिले (अंगणवाडी सेविका) सारिका साखरे (आशा सेविका) हेमंत कुमोटे,राजकुमार दर्रो,रंजीत नंदेश्वर इत्यादी उपस्थित होते.