खैरलांजी येथे रस्ता बांधकामाकरिता २०.०० लक्ष मंजूर – आ. रहांगडाले यांच्या हस्ते भूमिपूजन

0
26

तिरोडा- तिरोडा तालुक्यातील खैरलांजी येथे गावांतर्गत रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडल्यामुळे सदर रस्ता बनविण्याबाबत सरपंच व गावकऱ्यांची मोठया प्रमाणात मागणी होती. यावर आमदार महोदयांनी तात्काळ २०.०० लक्ष मंजूर करवून सदर रस्त्याचे भूमिपूजन करून रस्ता कामाला सुरुवात करण्यात आले यावेळी प्रामुख्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, जि.प.सदस्य चत्रभूज बिसेन,प्रवीण पटले प.स. उपसभापती हुपराज जमाईवार,प.स.सदस्य डॉ.चेतलाल भगत, सरपंचा संगीता बुद्धे, उपसरपंच खुशाल कडव, पोलीस पाटील राजू कडव ग्रा.प.सदस्य मनोहर बुद्धे,जाधोराव बुद्धे, राणी गोन्धुडे,ललिता देव्हारे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष कडव, सदस्य भारती कडव व नागरिक उपस्थित होते.