गहेलाटोला शेतशिवारात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला….

0
101

गोरेगाव,दि.23ः- तालुक्यातील गहेलाटोला येथील शेतशिवारात वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना आज २३ जून रोजी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान घडली.सदर शेतकरी हा आपल्या शेतशिवारात धानाची पेरणी करण्याकरता गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला चढविला.जखमी शेतकऱ्याचे नाव राजेश कांबळे (वय ३२)असे आहे. गावचे सरपंच व उपसरपंच संदीप मेश्राम यांनी ग्रामपंचायतीची मासिक बैठक सुरु असताना निरोप मिळताच त्यांनी बैठक सोडून लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली.तसेच गोरेगाव वन विभागाचे वनरक्षक सुरेश रांहांगडाले यांनी घटनास्थळ गाठले असून जखमींला ग्रामीण रुग्णालयात हलविले. पावसाळ्याच्या दिवसात शेतीचे कामे असतात शेतशिवारात शेतकरी शेतीकामे करण्याकरिता जात असतात परंतु दिवसेंदिवस होत असलेल्या वाघांच्या हल्ल्याने परिसरात दहशतीचे वातावरण कायम झाले आहे.