अर्जुनी मोर.दि.25 :--गोंदिया जिल्हयातील उन्हाळी रब्बी पिकाचे धान खरेदीची मर्यादा वाढवून मिळावी यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने वारंवा मागणी केंद्र सरकारकडे करुनही दखल न घेतल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकच्याकडे लाखो क्विंटल धान पडून आहे.धान खरेदी केंद्राकडून थोड्या शेतकऱ्याकडील धानाची खरेदी झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याकडे घरी धान पडून असल्याने पावसाळी पिक घेण्यासाठी शेतकर्याकडे पैसा नाही. केंद्र सरकार दखल घेत नाही म्हणून २४ जून २०२२ रोजी मुंबई मंत्रालय येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अन्नपुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे यांची भेट घेत चर्चा केली.तसेच उन्हाळी रब्बी धान खरेदीची मर्यादा मुदत वाढीसाठी राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात यावे अशी विनंती आमदार चंद्रिकापुरे यांनी केली.