ग्रामसेवक युनियनतर्फे सेवानवृत्तीपर सत्कार

0
25

तिरोडा- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तिरोडा शाखातर्फे सन २0२१-२२ ते २0२२-२३ या वर्षात सेवानवृत्त झालेले ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकरी तसेच तिरोडा तालुक्यातील इतरत्र बदली झालेले ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, सचिन कुथे, शैलेश परिहार, कार्तिक चव्हाण, रामा जमाईवार, अतकरी, जी.जी.जमाईवार, एस.एम.लिल्हारे, रितेश पटले, धारगावे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सेवानवृत्त ग्रामविकास अधिकारी बी.आर.हटवार, के.टी.बाळणे, पी.जी.ठाकरे, प्रशांत ऊईके, विरू भुते, नंदा बन्सोड, गुलाब लिल्हारे, सुरेश गोर्‍हे, हेमराज वरठे, सुभाष पहरेले, डी.पी.शहारे, ग्रामविकास अधिकारी पदोन्नती झालेले बी.एस.फटींग, एस.एम.तिडके, व्ही.बी.साखरकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सुमेध बन्सोड यांनी केले. यशस्वीतेसाठी पटले, एस.बी. धोटे, प्रल्हाद चौधरी, डी.एच. वाघमारे, बी.एम. सोनवाने, आर.बी. बावणकुळे, एल.एस. बाळणे, डी.एल. शहारे, एस.डब्ल्यू. मुठे, चंद्रकला कटरे, वनिता कावळे, व्ही.एस. मेर्शाम, दिलीप राऊत, मालाधारी, वरठी, एम.एम.कोवे, कमलेश तुरकर, सुर्यवंशी, बिसेन, एच.पटले, अरूण उके, काकाडे, यांनी सहकार्य केले.