35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय अर्जुनी मोर तालुका काँग्रेसच्यावतीने अग्नीपथ योजनेच्या विरोधात निवेदन

अर्जुनी मोर तालुका काँग्रेसच्यावतीने अग्नीपथ योजनेच्या विरोधात निवेदन

0
21

blank

अर्जुनी-मोर,दि.28ः भारतीय सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेकरीता भारत सरकारने सुरू केलेली अग्निपथ योजना बंद करण्याच्या मागणीचे निवेदन अर्जुनी मोर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.निवेदनात भारत सरकारने भारतीय सैन्यदल भरती प्रक्रियेत बदल करून नव्याने सुरु केलेलीय अग्निपथ योजना ही अन्यायकारक असल्याने ती बंद करण्यात यावे.कारण या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलबंले आहे,याचा विरोध काँग्रेस करीत असल्याचे म्हटले आहे. निवेदनदेतेवेळी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष भागवत नाकाडे,इंद्रदास झिलपे,अनिल दहिवले, पंचायत समिती सदस्य घनश्याम घामट, पंचायत समिती सदस्य बागेश्वरी सयाम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

blank