34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ त्या वनरक्षकाला निलंबित करा,गावकऱ्यांची मागणी

त्या वनरक्षकाला निलंबित करा,गावकऱ्यांची मागणी

0
61

blank

सलंगटोला,मंदिटोला येथील घटना

सडक अर्जुनी,दि.28ः  वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी मधील येणाऱ्या सह वनक्षेत्र कार्यालय कोहमारा मद्ये येनाऱ्या राजगुडा येथील वनरक्षकाला निलंबित करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सलांटोला लगत असलेल्या नाल्याजवळील गट क्रमांक 185 मधील झुडपी जंगलातील चार सागवान झाडे कापल्या प्रकरणी वनरक्षक दिपक बोधनकर याला निलंबित करण्याची मागणी गावकऱ्यांनी एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर गट क्रमांक 185 मधील चार झाडे कापली आहेत, त्या झाडांची किंमत 3,85,001 /- रुपये असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद केली आहे.
वनरक्षक बोधलकर याला अवैद्य वृक्षतोडकेल्या प्रकरणात , आर्थिक देवाण घेवाण करून सहकार्य के बोलले जात आहे. सदर प्रकरणात एका ठेकेदाराला झाडे कापल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, पण त्या वनरक्षकावर कुठलीच कारवाई केली नसल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे.
यात चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्याचे चर्चा होत आहे.
सदर सागवान झाडाचा पंचनामा करून राजगुडा चे सरपंच मोहन सुरसावत यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
सदर जप्त केलेला सागवान नेण्यासाठी तारीख 26/ 6 /2022 ला काही वनकर्मचारी गेले असता, गावकऱ्यांनी तो सागवान उचलण्यास मनाई केली, पहिल्यांदा त्या दोषी वनरक्षकावर कारवाही करा, तरच त्या सागवान मालाची उचल करा, अशी मागणी रेटून धरली आहे.
सलाग/टोला, राजगुडा ,मंदीटोला परिसरात तील जंगलाची 100% चौकशी केल्यास अवैध वृक्षतोड दिसून येईल . वनविभागाचे फिरते पथक यांची शुधा बघ्याची भूमिका असल्याचे दिसत आहे.
ह्याच परिसरातील जंगलातील सागवान झाडे तोडून काही खासरा प्रकरणात टाकल्याची जोरदार चर्चा आहे.
सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून ,काही तोडलेले सागवान झाडांची थुटावर माती टाकून लपऊन ठेवले आहेत, तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष निष्पक्ष चौकशी करून बोधलकर वनरक्षकांला निलंबित करण्याची मागणी लेखलाल टेकाम, मोहन सरसावत, राजविलास परतेकी , लक्ष्मण कुंभरे , तुलसीदास मरस्कोल्हे ,राजेश सेडमते , कैलास विठ्ठले आदी गावकऱ्यांनी केली आहे.

blank