तिरोडा पंचायत समितीत कृषी दिवस उत्साहात

0
26

तिरोडा, दि.1 : तिरोडा पंचायत समितीच्या सभागृहात डॉ.वसंतराव नाईक (माझी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवार, 1 जुलै रोजी कृषी दिवस साजरा करण्यात आला. तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कृषी दिवस

अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती हुपराज जमईवार होते. याप्रसंगी प्रामुख्याने कुंता पटले (सभापती, पंचायत समिती तिरोडा), जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी, तुमेश्वरी बघेले, खंडविकास अधिकारी सतीश लिल्हारे, पशुवैद्यकीय अधिकारी प्रकाश गंगापारी, तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष भाऊराव कठाने, मुंडीकोटाचे मंडळ कृषी अधिकारी पंकज जिभकाटे, तिरोड्याचे मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक उमेश सोनवणे, पंचायत समिती सदस्य चेतलाल भगत, जयप्रकाश पटले, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.