माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक जयंती वृक्षवाटप करुन साजरी

0
16
गोंदिया १ जुलै* कृषीदिन म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांचे जन्म दिवस महाराष्ट्रात साजरा करण्यात येते.महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांचा राजा म्हणून यांची ओळख आहे.माझा महाराष्ट्र व शेतकरी सुजलाम सुफलाम झालाच पाहिजे यासाठी सतत कार्यरत राहून विकास घडवून आणणार्‍या या नेत्याची ओळख आहे.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेकडून वृक्षलागवड व २२५ झाडे वाटप करुन साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला *सुरेशजी चौरागडे,मनोज दिक्षित,बबन मे्श्राम,मस्करे सर,लाहाणे सर,ईसु राव* प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी प्राविण्य प्राप्त वेदांत मधुकर जाधव १२ वी मध्ये ९५% गुण व तनिष्क रंजित राठोड १० वी (cbse) ९३% घेऊन पास झाल्याबद्दल पाहुण्याच्या हस्ते पुष्पगुच्छ व रोपटे देवून अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी  डॉ *.बाबुसिंग राठोड,संजय राठोड,विलास राठोड,प्रभुदास केळुत,मनोज वडते बनाथर,महेश राठोड,मनोज चव्हाण,राम आडे,धिरज जाधव,संघटनेचे पदाधिकारी व बंजारा समाजबांधव व विध्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित*  होते.कार्यक्रमाचे संचलन प्रदिप राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद जाधव यांनी केले.